Tuesday, August 13, 2013

“ब्रह्मास्त्राचा इतिहास”..!!


“आमचा इतिहास..
     द्वेषाने झपाटलेल्या अर्वाचीन संशोधकांना आव्हान देईल..प्रस्थापितांनी इतिहास
     दडपून ठेवल्याचा डांगोरा पिटणाऱ्या कोतवालांना त्यांच्याच भाषेत समाज देईल,
     कारण हा आमचा इतिहास आहे !!
  शेंडीजानाव्याइतकेच महत्व ब्राह्मस्त्राला देणारा,
  साम,दाम आणि भेदाबरोबरच दंडनीती शिकविणारा”..




  दिव्य ज्या ब्राह्मतेजाने  निर्मिले शास्त्रवेदांना        
भासतो तोच अंधार दुर्दैवी विद्रोह्यांना
भोपळा भ्रमाचा आहे वाटते पुरोगाम्यांना
भुंकणे जसे श्वानाचे
ओरडणे  कोल्होबाचे
त्यापरी बोलणे ज्यांचे
त्यांनाच सांगतो खास ब्रह्मास्त्राचा इतिहास !

विद्रोह कशास म्हणावे हेही ज्यांना नच ठावे
त्यांनीही  विद्रोहाचे ढोलके सदा बडवावे
द्वेषाच्या नावाखाली नवनवे धर्म स्थापावे
श्वानाला लाजविणारे
द्वेषाला माजविणारे
रानाटी वागणे सारे
प्रत्युत्तर चोख तयास ब्रह्मास्त्राचा इतिहास !
घाणीच्या सान्निध्यात कुजलेले धान्य रुजावे 
भूमीच्या रक्षेसाठी भूछत्र तिथे उगवावे
पावसात रिमझिमणाऱ्या नामशेष त्याने व्हावे
त्या भूछत्रासम ज्यांचा
तोडका-मोडका साचा
धर्म तो फक्त नावाचा
वाचवा त्यांनी खास ब्रह्मास्त्राचा इतिहास !!

उठसूट यावे त्याने वाटेल तसे बरळावे
फाडून स्मृतीग्रंथांना या षंढांनी जाळावे
सर्वथा हेच उद्योग त्या विद्रोह्यांना ठावे
स्मृत्यर्थ न ज्यांना ठावा
त्यांनी तो ध्यानी घ्यावा
उपहास न व्यर्थ करावा
थोपविल आता त्यास ब्रह्मास्त्राचा इतिहास !!


निंदिती देवधार्माला मानिती त्यास थोतांड
समितीत अंधश्रद्धेच्या थोपटती आपुले दंड
आव्हान देत धर्माला दावितात काळे तोंड
अर्व्याच्य शिव्याशापांनी
बाटली जयांची वाणी
त्यांनाही पाजिल पाणी
रोखिल तयांचा श्वास ब्रह्मास्त्राचा इतिहास !!

चारही दिशा गातील वेदांचा अर्थ रसाळ
तो ऐकोनी हिमवान नमविल आपुले भाळ
पाहून ब्राह्म्यतेजाला थांबेल धावता काळ
थांबवू शके काळाला
ती ब्राह्मण्याची ज्वाला
देतसे साक्ष आम्हाला
वाढवी आत्मविश्वास ब्रह्मास्त्राचा इतिहास !!

हा भास नव्हे इतिहास तळपत्या ब्रह्मगोलाचा
मावळत्या गतकाळाचा उगवत्या वर्तमानाचा
निस्वार्थ सदाचारणाचा तेजस्वी भवितव्याचा
व्याख्याता वेदांताचा
दाता जो संस्कारांचा
उद्गाता सिद्धांतांचा
सत्याचा घेई ध्यास ब्रह्मास्त्राचा इतिहास !!

विद्रोहाचा काळोख द्वेषाचा अंधःकार
तेवता दिवा तेजस्वी ब्राह्मण्याचा हुंकार
जाण्यास दाखवी वाट त्या अंधाराच्या पार
क्रांतीचा नंदादीप
ध्येयाच्या नेई समीप
शांतीचे दावी रूप
शंकेचे तोडी पाश ब्रह्मास्त्राचा इतिहास !!


जातीचे ब्राह्मण आम्ही आर्यांचा लाभे वंश
पाईक वेदवाणीचे विद्रोह करू निर्वंश
रक्तात अमुच्या आहे परशुरामांचा अंश
ब्रह्मांड अमुच्या पाठी
सिंहावलोकनासाठी
ही ब्राह्मगर्जना मोठी
फेडील मनीची आस ब्रह्मास्त्राचा इतिहास !!

_______

No comments:

Post a Comment