Sunday, September 8, 2013


ब्रह्मगर्जना..!!

काळाची परिमाणे बदलली,वाऱ्याची दिशा बदलली ,नद्यांचे प्रवाह बदलले,तरीही 
अथांग पसरलेल्या महासागराप्रमाणे आजही आम्ही स्वतःचे अस्तित्व 
टिकविण्यासाठी समर्थ आहोत..
वटवाघुळांची फडफड,घुबडांचे घुत्कार,कावळ्यांची कावकाव,कुत्र्यांचे भुंकणे अन् कोल्ह्यांची कोल्हेकुई येरवी स्वतंत्रपणे ऐकू येत असली तरी एकट्या सिंहाची
गर्जना घनदाट आरण्यात घुमताच निरव शांतता पसरते.
कळपाने फिरणारे “वनराज” कधीही ठरू शकत नाहीत..!!
म्हणूनच ब्राह्मणांनी आता स्वतःचे अस्तित्व ओळखून ऐक्याची भीष्मप्रतिज्ञा करीत सारा आसमंत निनादून सोडणे ही सांप्रतकाळाची गरज ठरते..



ब्राह्मण्याच्या सामर्थ्याचा पुन्हा दाखला देवू |
करू गर्जना ऐक्यासाठी चला प्रतिज्ञा घेवू ||१||

कुणी महात्मे देती ग्वाही एकविसाव्या शतकाची |
कुणी रंगवी जुनीपुराणी पाने गतकाळाची ||
हट्ट नव्याचा भार जुन्याचा मुळी  न खांदी वाहू ||१||

सिंह हिंडतो जरी एकटा तरी तयाचा धाक |
मनात वाटे प्रत्येकाच्या कानी येता हाक ||
अशा एकट्या अस्तित्वाचे भान अंतरी ठेवू ||२||

शाखा विस्ताराच्यावेळी होतो शाखाभेद |
संवादाऐवजी गाजतो व्याख्येसाठी वाद ||
विसरोनी शाखाभेदाला कृतीशीलता दावू ||३||

मंत्र जाणती यांत्राआधी विज्ञानाचे तंत्र |
तंत्र पालटे यंत्रासाठी पुन्हा शिकू एकत्र ||
नवी भरारी नभी घेवुनी नवी क्षितीजे पाहू ||४||

गती मृगाची असो,असो वा शार्दुलाची झेप |
भ्याडपणाच्या प्रवृत्तीला अधोगतीचा शाप ||
सधाया उन्नती आपुली जरा धाडसी होवू ||५||

आता चाकरी नको कुणाची नको कुणाचा त्रास |
लाचारी त्यागुनी धरूया उद्योगाची कास ||
स्वयंरोजगाराची गाथा एकमुखाने गावू ||६||

आत्मोद्धाराआधी मोडू विद्रोहाची खोड |
कर्तव्याला देवू सारे कर्तृत्वाची जोड ||
अटीतटीच्या स्पर्धेमध्ये कधी न मागे राहू ||७||

जपू मिराशी संस्कारांची षट्कर्माचे देणे |
निष्ठेने वागवू मस्तकी ब्राह्मण्याचे लेणे ||
शिखा आवळू शिरी केशरी टिळा कपाळी लावू ||८||

देवाच्या पायाशी वाहू उत्थानाची आण |
निर्धाराने जिंकू आम्ही सन्मानाचे स्थान ||
संघर्षाच्या वाट सारे शोधायाला जावू ||९||

__________